Thursday, 10 October 2019

तारिक कुरेशींचा भाजप प्राथमिक सदस्यत्वासह म्हाडा सभापतीचा राजीनामा

भंडारा,दि.10ः-भारतीय जनता पक्षात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने निष्ठावंत म्हणून काम करणारे अल्पसंख्याक समाजातील एकमेव वरिष्ठ नेते असलेले म्हाडाचे सभापती व भंडारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी यांनी आपल्या सभापतीचा व भाजप प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज(दि.10)दिल्याने भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा फटका एैन निवडणुकीच्या तोंडावर बसला आहे.
भंडारा-गोंदिया जिल्हा एकत्र असताना पासून त्यांनी पक्षाच्या विस्तारासाठीच नव्हे तर बळकटीसाठी अविरतपणे सेवा दिलेली आहे.महादेवराव शिवणकर,स्व.राम आस्वले यांच्यासोबत पक्षाच्या वाढीसाठी निष्ठेने काम केले.मात्र सध्याच्या घडीत गेल्या एक दोन वर्षातील पक्षाची जी स्थिती भंडारा जिल्ह्यात झालेली आहे.त्यातच वरिष्ठ असतानाही सातत्याने पक्षामध्ये  असलेली अपमानास्पद वागणूकीची परिस्थिती बघून अंतःकरणाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.तारिक कुरेशी यांची ही भूमिका भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर गोंदियातील भाजपला सुध्दा चांगलीच भोवणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...