गोंदिया,दि.05ःःतुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि 2019 च्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार चरण वाघणारे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यासोंबत संवाद साधत असतांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांच्यावर वैयक्तीकरित्या जोरदार हल्ला करीत आपल्याला खोट्या प्रकरणात फसवण्याचे षडयंत्र रचल्याचा जाहिर आरोप सोशल मिडीयाच्या माध्यमातून केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
वाघमारे यांनी आपल्यावर 20 वर्षापुर्वी तुरुंगात जाण्याची वेळ आली होती,परंतु पुन्हा तुरुगांत जाण्याची वेळ येईल असे कधीच वाटले नव्हते परंतु मला खोट्या विनयंभंगाच्या प्रकरणात मला फसवले.न्यायालयातून मला जामीन मिळू नये यासाठी पालकमंत्र्यांनीच प्रयत्न केले.येथील शासकीय वकील असताना नागपूरवरुन वकील का आणावे लागले असा प्रश्न उपस्थित करीत आपण तुरुगांतच राहू आणि उमेदवारी अर्ज भरु शकणार नाही असा त्यांचा समज होता.परंतु आपण उमेदवारी अर्ज भऱला आणि तो कायम राहिला.वाघमारे उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही हा तुरुगांतूनच निवडणुक लढवू शकतो असे झाले तर आपल्यावर प्रकरण उलटेल अशा भितीनेच त्यांचा नागपूरचा वकील न्यायालयतच हजर झाला नाही आणि आपणास कायम स्वरुपी जामीन मिळाल्याचे सांगितले.वाघमारे बोलतांना म्हणाले आपल्यावरील प्रेशर आता कमी झालेला आहे.शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याचाही आपल्याला फोन आल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीत कायम राहा आम्ही मदत करु असे सांगितले.माझ्याकडे आज प्रदिप पडोळे व काही पक्षाचे नेते आले,पडोळेंनी पाया पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची काही गरज नाही असे सांगत माझा मार्ग वेगळा आणि तुमचा वेगळा असे सांगितले.जर तुम्हाला माहित होते मला उमेदवारी मिळणार नाही तर मला का 4 महिन्याआधीच सांगितले नाही असाही प्रश्न खासदारांना केल्याचे सांगत या सर्वांनी आपला गेम केल्याचा त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.आपण निवडणुकीत कायम राहणार असून कार्यकर्त्यांनी कुणालाही शिविगाळ,मारहाण करु नये अपश्बदाचा वापर करु नये असे आवाहन त्यांनी केले.
तुमच्या सर्वांचा मला वचन हवा त्याच्या कुठल्याच कार्यक्रमात हजर राहणार नाही अशी विनंती आपणास करतो.साकोली विधानसभा मतदारसंघात परिणय फुके रिंगणात आहेत ते पटोलेंच्या पराभवासाठी फुके काम करीत असून आपला दुश्मन पालकमंत्री असल्याने आपल्याला वेळप्रसंगी साकोली मतदारसंघात नानाभाऊंना सहकार्य करुन आपल्याला बाहेरची पार्सल बाहेर पाठविण्याचा संकल्प करायचा असल्याचा संकल्प त्यांनी सभेत बोलून दाखवित फुंकवरील राग व्यक्त केला.
महिलांचा सन्मान करणारा आमचा पक्ष,व्देषापोटी माझ्यावर खोटे आरोप -डाॅ.परिणय फुके
तुमसरचे विद्यमान आमदार व येत्या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले चरण वाघमारे यांनी आज रविवारला कार्यकर्त्यासोंबत संवाद साधतांना आपल्यावर जे आरोप केले,ते वैयक्तिक व्देषापोटी केले असून त्यांच्या विनयंभग प्रकरणात अडकण्याशी आपला तिळमात्र संबध नसल्याचे सांगत आमचा भाजप पक्ष हा महिलांचा सन्मान राखणारा पक्ष असल्याची प्रतिक्रिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांनी बेरार टाईम्सला दिली.डाॅ.फुके यांनी सांगितले की,ज्या प्रकरणात चरणभाऊंवर आरोप झाले,त्याप्रकरणात त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी आपण पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन चर्चा केली.तसेच चरणभाऊना आपण जामिन घ्यावा अशी विनंती केली,परंतु त्यांनी ती नाकारली.आपण काही त्या महिला पोलीस कर्मचार्याला भांडण करायला लावले नाही.परंतु एखाद्या महिला अधिकारीचा अशाप्रकारे अपमान कुणी करीत असेल तर ते योग्यही नाही असे सांगत ज्यादिवशी तुमसर येथे हे प्रकरण घडले,त्यादिवशी मुळात पुण्यात आपल्या जावयांकडे झालेल्या निधनाच्या कार्यक्रमात दोन दिवस व्यस्त असल्याने याप्रकरणाची मला माहितीही नव्हती असे सांगितले.त्यानतंर मुबंईला निघालो आणि परत आल्यानंतर माहिती होताच भंडारा येथे येऊन पोलीस अधिक्षकांची भेट घेतली.ज्यापध्दतीने चरणभाऊ माझ्यावर आरोप करीत आहेत,ते पुर्णत व्देषपुर्ण असून याआधीही ते ज्याठिकाणी राहिलेत त्या पक्षातील लोकांवर आरोप केलेले आहेत.या आधी नानाभाऊ,मधुभाऊ यांच्यावरही त्यांनी आगपाखड केली आहे.आता विनयभंगाच्या आरोपात अडकल्यानेच पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली,मात्र तो रोष माझ्यावर दाखवून समाजात भ्रम निर्माण करीत असल्याचे डाॅ.फुके यांनी सांगत याप्रकरणात न्यायालयातून ते निर्दोष सुटले तर आमचा पक्ष भविष्यात त्यांचाही विचार करेल परंतु आपण अशा घाणेरड्या राजकारणापासून दूर असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment