गोंदिया,दि.09 – : निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील चारही मतदारसंघात विविध ठिकाणी नाकेबंदी केली जात आहे. या नाक्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात व जिल्ह्यातील मतदारसंघात दारुची होणारी तस्करी तसेच जिल्ह्यात अवैधपणे येणारी रोख रक्कम जप्त करण्याचे काम करण्यात येत आहे.
८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता तिरोडा तालुक्यातील बोंडराणी नाका येथे सांख्यिकी निरीक्षण पथकाचे पथक प्रमुख तलाठी ए.एल.बिसेन यांच्या पथकाने दुचाकी वाहनाने मध्यप्रदेशातील खैरलांजी मार्गावरुन एका दुचाकी वाहनाने येणार्या प्रीतमकुमार पिंजाणी रा.तिरोडा या व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडून रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले. जप्त केलेली रक्कम तिरोडा येथील उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. रोख रक्कम जमा केल्याची पावती सदर इसमास देण्यात आली असून याबाबत पुढील चौकशी सुरु आहे.
No comments:
Post a Comment