Wednesday 2 October 2019

देवरी नगरपंचायतच्या कर्मचार्यानीं केले गांधीजयंती निमित्त शहर स्वच्छ

प्रभारी मुख्याधिकारी यानीं गांधीजीच्या प्रतीमेची पुजा करुन केली शहर स्वच्छ अभियानाला सुरुवात




देवरी,दि.02 - देवरी नगरपंचायत विकासाच्या दृष्टिने आज स्थितीत ७०% वर येऊन पोहचला आहे. शहरात अनेक विकास कामे होऊन शहराच्या सौंदर्यकरणकडे जास्त  दिले जात आहे परंतु देवरी नगरपंचायतला नियमीत मुख्याधीकारी नसल्यामुळे शहराच्या विकासकामाला खीडं पडली आहे. अनेक विकास कामे प्रलंबित असुन कामाला कासवाची गती निर्मान झाली आहे. देवरी नगरपंतायतचे मुख्याधीकारी जावुन दोन महीने लोटले तरी संपुर्ण कार्य प्रभारी यांच्याच भरोस्यावर ठेवन्यात आले आहे.

सविस्तर असे की, शासनाने प्लास्टीक बंदी केल्यामुळे शहरात सतत नगरपंचायतच्या कर्मचार्याकड़ून दर दोन दिवसानी प्लास्टीक बंदीवर जनजागरण करण्यात येत आहे. गांधी जयंती निमित्ताने नगरपंचायत येथे नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधीकारी विजय बोरुडे यांच्याहस्ते स्वच्छतेच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली. नगरपंचायतच्या कर्मचार्यानीं शहरभर  रँली काढत शहरातील लोकांना प्लास्टीक च्या होणाऱ्या दुष्परिणामावर मार्गदर्शन करत जनजाग्रुती करण्यात आली. 
नगरपंचायततर्फे करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात नगरपंचातचे कर्मचारी,रमेश बोमनवार ,कैलाश सोनवाने, देवचंद बहेकार,आचले सर,हजारे सर,सचिन मेश्राम, रमेश बोमनवार,विजय पटले,अमोल पटले,वामन फुके व विशेषकरुन देवरी शहरातील महिला बचत गटाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...