गोंदिया, दि. 18 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला त्यादिवसापासूनच जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाची विविध पथके गठित करण्यात आली असून विविध ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत अवैध मद्य वाहतुकीच्या प्रकरणात एकुण 299 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये एकुण 33 हजार 905.64 लिटर अवैध दारु असा एकुण 44.16 लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 3 मद्य विक्रेत्यांची तात्पुरत्या स्वरुपात परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.
विविध हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4, तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी 3, गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी 3 आणि आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4 अशी एकुण 14 स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत असुन विविध कारवाईमध्ये या पथकामार्फत एकुण 13 लाख 29 हजार 530 रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment