Friday, 4 October 2019

अभूतपूर्व गर्दीः काँग्रेसच्या वतीने सहेसराम कोरेटींचे नामांकन दाखल


 ऐतिहासिक रॅलीचे प्रदर्शन
 राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक घेतली शिंगावर


देवरी,दि.04 : 66 आमगाव-देवरी विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सहेसराम कोरेटी यांनी आज आपले नामांकन दाखल केले. आमगाव विधानसभा निवडणुकीत नामांकन दाखल करताना होणाऱ्या शक्तीप्रदर्शनामध्ये यावेळी काँग्रेस आघाडीने इतिहास घडविला. समर्थकांच्या या अभूतपूर्व गर्दीत आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक शिंगावर घेतल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय म्हणजे आज झालेले शक्तीप्रदर्शन बघता विरोधकांनी सुद्धा आपल्या तोंडावर हात ठेवल्याचे चित्र बघायला मिळाले. 
आमगाव-देवरी विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने आघाडीचे उमेदवार म्हणून सहेसराम कोरेटी यांनी आज आपल्या हजारो समर्थकांच्या साक्षीने आपले नामांकन दाखल केले. यावेळी मॉ धुकेश्वरी मंदिरापासून काढण्यात आलेल्या रॅलीने श्री कोरेटी यांनी आपले शक्तीप्रदर्शन केले. उल्लेखनीय म्हणजे काल भाजपच्या वतीने विद्यमान आमदार यांनी सुद्धा आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आपले नामांकन दाखल केले होते. त्यावेळी देवरीकर गर्दी पाहून अवाक झाले होते. मात्र, आज कोरेटी समर्थकांची संख्या पाहता ही रॅली अभूतपूर्व झाल्याची चर्चा देवरीकरात रंगली होती. या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसने ही निवडणूक आपल्या शिंगावर घेतल्याचे दिसून येत होते.नामांकन दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, रमेश ताराम, दुर्गा तिराले, कमलबापू बहेकार, तुकाराम बोहरे, प्रभाकर दोनोडे, सुकराम फुंडे, राजेश भक्तवर्ती, सुरेश हर्षे, जीयालाल पंधरे, पारबता चांदेवार, सुमन बिसेन, अर्चना ताराम, छोटेलाल बिसेन तर कॉग्रेसचे वरिष्ठ नेते टोलसिंह पवार, पुरुषोत्तम कटरे, भरत बहेकार, यादवराव बनोटे, वासुदेव चुटे, टिनू पटेल,एड. प्रशांत संगीडवार,संदीप भाटिया, ओमराज बहेकार,माधुरी कुंभरे, दीपक पवार, उषा शहारे आदी नेते हजर होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...