Thursday, 3 October 2019

भाजप माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवांलाची बंडखोरी,अपक्ष उमेदवारी दाखल




 गोंदिया,दि.03ः- भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व 2014 मधील  गोंदिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार विनोद अग्रवाल यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी आज गुरुवारला(दि.03)बंडखोरी करीत भव्य मिरवणुक काढून हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून अपक्ष नामांकन दाखल केले आहे.
नामाकंन दाखल करण्यापुर्वी ग्रामीण भागातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी येथील स्वागत लाॅन परिसरात आयोजित जाहिर सभेत मार्गदर्शन केले. पक्षानेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पक्षातून जाहिररित्या काढून टाकले तरी आता आम्ही मागे बघणार नाही, अशी जाहिर भूमिका घेत भाजपने दिलेल्या उमेदवाराचा विरोध केला. वेळ प्रसंग आल्यास आम्ही सर्व राजीनामे देऊ असे शहर भाजप व गोंदिया ग्रामीण भाजप मंडळाच्या पदाधिकारीसह काही नगरसेवकांनी व भाजप पदाधिकार्यांनी भूमिका घेतल्याने गोंदिया विधानसभा मतदारसंघात मात्र चुरस निर्माण झाली आहे.
गोंदिया विधानसभा मतदार संघाची भाजपची उमेदवारी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षातील दावेदारांना डावलून कॉंग्रेसमधून ३० सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या गोपालदास अग्रवाल यांना देण्यात आली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी आज(दि. ३) बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. कोणत्याही परिस्थितीत आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे बोलून दाखवल्यामुळे आता भाजपलाच घाम फुटला आहे. विनोद अग्रवाल यांनी आज शहरातील स्वागत लॉनमध्ये सभा घेवून शहरातून रॅली काढली. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित होते. एकप्रकारे त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. भाजपमध्येच बंडखोरी होत असल्यामुळे नव्याने पक्ष प्रवेश करणाऱ्या गोपाल अग्रवालांपुढे स्वकीयांचेच आव्हान असणार आहे. दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्याप उमेदवार घोषीत केला नसल्यामुळे पेच कायम आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...