मॉ धुकेश्वरी परिसरात दीपावली मिलन उत्साहात
देवरी,दि.२८- गेल्या अनेक वर्षापासून आमगाव विधानसभा क्षेत्रात लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा योग मला लाभला. सातत्याने करीत असलेले जनसंपर्क आणि जनसेवा करण्याची संधी मला ईश्वरकृपेने मिळाली. परिणामी, लोकांनी मला प्रेमापोटी आपल्या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढली आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे, हा एकमेव ध्येय मी उराशी बाळगून आहे. मात्र, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मला आपण सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या सहकार्याशिवाय मी पुढे जाणार नाही, असे प्रतिपादन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार सहसराम कोरोटे यांनी देवरी येथे बोलताना केले.दरम्यान, मॉ धुकेश्वरी मंदीर परिसरात सर्वधर्मिय दीपावली मिलन उत्साहात पार पडले.
ते देवरी येथील मा धुकेश्वरी परिसरात धुकेश्वरी ट्रस्टच्या वतीने आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती संतोष कुर्वे, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन,ठाणेदार कमलेश बच्छाव, नगरसेवक सीता रंगारी, झामqसग येरणे, माजी सभापती राधेश्याम बगडीया, जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, माजी जिप सदस्य पारबता चांदेवार, सामाजिक कार्यकत्र्या सीमा कोरोटे, कुलवंतqसग भाटिया, परमजितqसग भाटिया, के.सी.शहारे, महेंद्र मेश्राम, जुमेदखान, सय्यद, श्री.तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रशांत संगीडवार यांनी केले.संचलन आणि आभार कुलदीप लांजेवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुवरलाल भेलावे, प्रेमकुमार रिनाईत, आनंद नळपते, प्रा. मधुकर शेंद्रे, बाबूराव क्षिरसागर, संजय मलेवार, राजकुमार शाहू, छोटेलाल बिसेन, शिवकुमार परिहार, दिनेश भेलावे, माया राजनकर आदी पदाधिकाèयांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment