गोंदिया,दि.01-गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजप-सेनेच्या युतीमध्ये सेनेकडे असलेली गोंदिया विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपच्या कोट्यात गेल्याने शिवसेनेकडून एकमेव दावेदार असलेले जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांना मात्र शांत बसण्याची वेळ आली आहे.
सेनेकडून ही जागा भाजपकडे गेल्यानंतर बोलतांना शिवहरे यांनी आपली निवडणुक लढायची पुर्ण तयारी झालेली होती.गावागावामध्ये पक्षसंघटन बुथस्तरावर तयार करण्यात आले होते.लोकसभा निवडणुकीतही शिवसैनिकांनी मनापासून काम केल्यानेच गोंदिया मतदारसंघात वाढ मिळालेली होती.मात्र युतीच्या जागावाटपात जिल्ह्यातील एकमेव असलेली ही जागा गेल्यानेही मोठे दुःख झाले असून पक्षाचा हा निर्णय स्थानिक कार्यकत्र्यासांठी मात्र धोकादायक ठरला असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय सर्वत्तोपरी मान्य असून आपण पक्षप्रमुखासांठी काहीही त्याग करायला तयार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी सांगितले.शिवसैनिक अंखड महाराष्ट्र व qहदुत्वाच्या मुद्यावर काम करीत असून उध्दवजीने घेतलेल्या निर्णयाचा आदर करीत आम्ही युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा धर्म पाळू यात कुठलीही शंका कुंशका नसल्याचे शिवहरे म्हणाले.
No comments:
Post a Comment