गोंदिया,दि.06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कार्य आणि ध्येय धोरणातून संपूर्ण जगात भारताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रामाणिक नेतृत्त्व आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील पाच वर्षांपासून राज्यात शासन चालवित आहेत. अंत्यत पारदर्शक कारभार असणाऱ्या अशा नेतृत्त्वाच्या पाठीशी सर्व जनतेनी पुन्हा एकदा उभे राहावे असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शुक्रवारी युतीचे उमेदवार म्हणून नामाकंन दाखल केले.त्यापूर्वी सर्कस मैदानावर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ.खोमेश रहांगडाले,भैरसिंह नागपूरे,केशवराव मानकर भाजप महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी. जि.प.सदस्य नेतराम कटरे, माजी आ.रमेश कुथे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पकंज रहांगडाले, भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका, गोंदिया ग्रामीण तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, जि.प. अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद,नंदुभाऊ बिसेन,डाॅ.बबली अग्रवाल,मधु अग्रवाल,जि.प.सभापती शैलजा सोनेवाने,राजेश चतुर, माधुरी हरिणखेडे, रमेश अंबुले, घनश्याम पानतवने, शकील मन्सुरी, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले मागील पाच वर्षांत गोंदिया विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे झाली आहे. महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर झाली असल्याचे सांगितले. हेमंत पटले म्हणाले, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षाची शिस्त भंग करणाऱ्या पक्षात कुठलेच स्थान नाही. गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या मुद्दावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. आता त्यांच्या नेतृत्त्वात गोंदिया विधानसभा क्षेत्राचा अधिक गतीने विकास होणार असल्याचे अशोक इंगळे यांनी सांगितले.या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम, अपूर्व अग्रवाल यांनी केले. सभेनंतर सकर्स मैदान येथून भव्य रॅली काढण्यात आली. यात भाजपचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गोपालदास अग्रवाल यांनी रविवारला दतोरा,गुदमा,मोरवाही,पांजरा,कामठा,लबांटोला,झिलमिली,परसवाडा,नवरगाव खुर्द,इर्री,मोरवाई आदी गावामध्ये आयोजित प्रचारसभेलाही संबोधित करीत क्षेत्राच्या विकासासाठीच नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे हात मजबुत करण्याचे आवाहन केले.त्यांच्यासोबत गोंदिया जिल्हा मजुर संघ दिपक कदम,जि.प.चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे यांनीही मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment