देवरी,दि.03ः- ये्त्या विधानसभा निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संजय पुराम यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवडणुक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केला.
आमदार पुराम यांनी पदयात्रा काढत निवडणुक अधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार केशवराव मानकर,भैरसिंह नागपूरे,अर्बन बँकेच अध्यक्ष महेश जैन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हामिद अल्ताप, येशुलाल उपराडे, प्रमोद संगीडवार, सविता पुराम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment