Thursday, 10 October 2019

52 वर्षीय इसमाची रेंगेपार येथे अज्ञातानी केली हत्या



सडक अर्जुनी,दि.10–डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या रेंगेपार येथील मनोहर नंदलाल उईके (वय 52)यांची 09 ऑक्टोबंर च्या रात्रीला अज्ञात आरोपींनी हत्या केल्याची घटना आज 10 ऑक्टोबंर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

उईके हा रोज शेतातील धान पिकाची राखण करण्यासाठी शेतातील मचाणीवर झोपायचा.आरोपींनी उईकेच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे दिसून आले आहे.हत्येचे कारण कळू शकलेले नसून डुग्गीपार पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन तपासाला सुरवात केली आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...