आमगाव,दि.21 – आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातर्गंत येत असलेल्या आमगाव तालुक्यातील सितेपार ग्रामस्थांनी गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदारांने गावाचा विकासाकडे कानाडोळा केल्याने ग्रामस्थांनी मतदानावरच बहिष्कार घातला.
२ हजार ५०० च्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावातील ग्रामस्थांनी आधीच प्रशासनाला निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदन दिले होते.त्यानंतर प्रशासनाने सुध्दा ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,परंतु त्या प्रयत्नाला अपयश आले असून ८० टक्के ग्रामस्थांनी बहिष्कार कायम ठेवला.गावात प्राथमिक आरोग्य केंद्र,पिण्याचा पाण्याची सोय तसेच गावातील अंतर्गत रोड, रस्त्याची दुरवस्था झालेली असून या समस्या सोडविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे.एकीकडे ८० टक्के ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला असतांनाच गावातील काही मतदांरानी मात्र मतदानाचा हक्क बजावला.
No comments:
Post a Comment