भाजप-कॉंग्रेसमध्ये थेट रंगणार सामना
देवरी,दि.02- 66- विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसच्या उमेदवारीवरील सावट अखेर पक्षाने यादी जाहीर करून दूर सारले. या मतदार संघात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने अल्पावधीतच लोकप्रिय झालेले सहेसराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सहेसराम कोरेटी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम आणि कोरेटी यांच्यात थेट सामना रंगण्याचे चित्र सध्यातरी मतदार संघात आहे. दोन्ही बाजूने सध्यातरी बंडखोरीची चिन्हे दिसत नाही. असे असले तरी माजी आमदार रामरतन राऊत कमालीचे दुखावले गेले असल्याने त्यांची भूमिका सुद्धा महत्वाची राहणार असल्याची चर्चा आहे.

No comments:
Post a Comment