Wednesday, 2 October 2019

जिल्हा काँग्रेस गोंदिया विधानसभा ताकदीने लढणार-जिल्हा काँग्रेसची पत्रपरिषदेत माहिती

गोंदिया,दि.02ः- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला फटका बसला नसून गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवारासोबत ताकदीने निवडणुक लढणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे व प्रदेश सचिव विनोद जैन यांनी आज शहिद भोला काँग्रेस भवनात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
सोबतच गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अमर वराडे,विजय बहेकार यांनी आधीच उमेदवारी मागीतली असल्याने पक्षाकडे होते.परंतु जिल्हा काँग्रेसच्या कोअर कमिटीने नाना पटोलेंनी गोंदियातून लढावे यासंबधीचा ठराव पाठविल्याचेही सांगितले.पटोलेंनी नकार दिल्याने पक्षाने पोवार समाजातील उमेदवाराचेही नाव मागितल्याने परत आम्ही ओबीसी समाजातील अमर वराडे,पी.जी.कटरे यांची नावे पाठविली असून पक्षाने निवडणुक लढण्याचे आदेश दिल्यास आपण स्वतः तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे म्हणाले.आ.अग्रवाल यांच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेसचे काही नुकसान झालेले नाही,त्यांनी आमदार असतांना ज्यांना पंचायत समिती,जिल्हा परिषद व नगरपरिषदेची उमेदवारी दिली तेच त्यांच्यासोबत गेले तर काँग्रेसविचारधारा म्हणून जे पक्षासोबत होते ते आजही सोबत असून 6 पैकी 1 जिल्हा परिषद सदस्य व 3 पंचायत समिती सदस्यांनी भाजपप्रवेश केला नसल्याचे सांगितले.ज्यांनी भाजपात प्रवेश केला असे शहर काँग्रेस अध्यक्ष,तालुका काँग्रेस अध्यक्ष,जि.प.अध्यक्ष,पंचायत समिती सभापती,नगरपरिषद सभापतीसंह पदाधिकारी यांची माहिती प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात आली असून त्यांच्या निलबंनाची कारवाई प्रदेश काँग्रेस लवकरच करेल असे विनोद जैन यांनी सांगितले.यापु्र्वी सुध्दा प्रफुल पटेलांनी काँग्रेस सोडली आणि ते राष्ट्रवादीत गेले,तेव्हाही आम्ही काँग्रेसमध्येच होतो आजही काँग्रेसमध्येच आहोत.आम्ही विचारधारेला महत्व देतो सत्तेला नव्हे असेही म्हणाले.आ.अग्रवाल हे बहुतेक सत्तेसाठी भाजपमध्ये गेले असावे असे त्यांच्या भाजपप्रवेशाच्या वेळी मुख्यमंत्र्याने व्यक्त केलेल्या विचारावरुन दिसून येत असल्याचेही पत्रपरिषदेत जैन यांनी सांगितले.पत्रपरिषदेला जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष डाॅ.झामसिंह बघेले,पी.जी.कटरे,प्रदेश सचिव अमर वराडे,प्रदेश सचिव विनोद जैन,जितेंद्र कटरे,एनएसयुआय अध्यक्ष हरिष तुळसकर,युवक काँग्रेसचे आलोक मोंहती,पृथ्वीपालसिंह गुलाटी,जहिर अहमद आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...