Thursday, 3 October 2019

शिवसेनेकडून मुकेश शिवहरे व नरेंद्र भोंडेकर दाखल करणार उमेदवारी अर्ज

गोंदिया/भंडारा,दि.03 :- भंडाराचे माजी आमदार तथा शिवसेनेचे भंडारा जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर हे भंडारा विधानसभा मतदार संघातून उद्या शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.तर गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे सुध्दा गोंदिया विधानसभा मतदारसंघाकरीता उद्या शुक्रवारला शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्या गोंदिया विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्यावतीने तयारीही सुरु करण्यात आलेली आहे.गोंदिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल लांजेवार,तालुका प्रमुख टोकेश हरिणखेडे,डिल्लू गुप्ता आदींनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तर भंडारा येथे भोंडेकर हे किसनलाल सभागृह, शुक्रवारी वार्ड, स्टेशन रोड, भंडारा येथून सकाळी ११ वाजता नामांकन अर्ज सादर करण्यासाठी भव्य मिरवणूक काढणार आहेत. यात हजारोंच्या संख्येने समर्थक सहभागी होणार आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्रभोंडेकर यांनी यावेळी भाजपा- शिवसेना युतीमध्ये शिवसेना पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. तथापि अंतिम क्षणापर्यंत पक्षाकडून कोणताच निर्णय कळविण्यात आला नसल्याने अखेर त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी किसनलाल सभागृह शुक्रवारी वार्ड येथून सकाळी ११ वाजता मिरवणूकीला प्रारंभ होणार असून, शास्त्री चौक, गांधी चौक, मेनरोड, पोस्टर ऑफीस चौक या मार्गाने मिरवणूक उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात पोहचेल. त्यानंतर नरेंद्र भोंडेकर हे उमेदवारी अर्ज सादर करतील. याप्रसंगी शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे विधानसभा प्रमुख बाळू फुलबांधे, तालुका प्रमुख अनिल गायधने भंडारा, विजय काटेखाये पवनी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...