Thursday 3 October 2019

साकोलीत फुके विरुद्ध पटोले सामना रंगणार

 नागपूरने नाकारले साकोली स्विकारणार काय?

साकोली,दि.03- नाना पटोले विरुद्ध भाजप हे द्वंद्व आता थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या गृहनगरात आव्हान दिले होते. परिणामी, आता भाजपने नाना पटोले विरुद्ध आपली संपूर्ण ताकद लावण्याचा चंग बांधला असून स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून नागपूरचे ़डॉ. परिणय फुके या तगड्या उमेदवाराला रिंगणात उतरविले आहे. परिणामी, नागपूरकरांनी पटोले यांना साफ नाकारले, तर साकोलीकर आता ़डॉ. फुके यांना स्विकारणार काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये साकोली मतदारसंघातून कॉंग्रेसचे नाना पटोले हे रिंगणात उतरणार, अशी चर्चा  गेल्या कित्येक महिन्यापासून सूरू होती. त्यांचे विरुद्ध सत्ताधारी भाजप कडून कोण रिंगणात उतरणार, हा औत्सुक्याच्या विषय होता. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस कमकुवत असताना केंद्रात सत्ताधारी पक्षाचे हेवीवेट केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी यांनाच नाना पटोले यांनी थेट आव्हान दिले होते. त्यामुळे नागपूर मतदार संघ संपूर्ण देशात चर्चेला आले होते. भाजपने सुद्धा या मतदार संघात आपली संपूर्ण ताकत पणाला लावून श्री गडकरी यांना विजयी केले. यावरून नागपूर करांनी नाना पटोले यांना बाहेरचे पार्सल म्हणून साफ नाकारले होते. 
 असे असले तरीही भाजपच्या वरिष्ट नेत्यामध्ये नाना द्वेष अद्यापही कायम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्याचा वचपा काढण्यासाठी साकोली विधानसभा मतदार संघात अनेक सक्षम कार्यकर्ते असताना सुद्धा भाजपकडून त्या कार्यकर्त्यावर एकप्रकारे अविश्वास दाखवत ़डॉ. फुके यांना रिंगणात उतरविले. या मुळे साकोली मतदार संघातील लढतीकडे केवळ राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीचा इतिहासात डोकावून बघितले तर भंडाला लोकसभा मतदार संघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नागपूरकर असलेले डॉ. श्रीकांत जिचकार या सारख्या  विद्वान मंडळींना सुद्धा भंडाराकरांनी साफ नाकारले होते. त्यामुळे डॉ. फुके हे चित्र पुसून टाकणार का की साकोलीकर आपल्या स्थानिक नेत्याला पसंती देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...