Thursday 10 October 2019

...अखेर रामरतन राऊत यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी

मुंबई,दि.10 - स्वपक्षाच्या विरुद्ध बंडखोरी करत अपक्ष म्हणून कॉंग्रेसला आव्हान देणारे माजी आमदार रामरतन राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीने पक्षातून हकालपट्टी केली आहेे. दरम्यान, साकोली विधानसभा मतदार संघातून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध रिंगणात दंड थोपटणाऱ्या साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये यांना सुद्धा पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
आमगाव विधानसभा मतदार संघातून कॉग्रेसच्या तिकीटावर तीनवेळी निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आणि आमदारकी उपभोगलेले माजी आमदार रामरतन राऊत यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरुद्ध दंड थोपटल्याने त्यांचेवर पक्षशिस्तीचा बडगा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे सूचनेवरून सरचिटणीस एड. गणेश पाटील यांनी निष्कासित केले आहे. श्री राउत यांच्या जोडीने साकोलीचे माजी आमदार यांचेवर सुद्धा सारखीच कार्यवाही करून त्यांना सुद्धा पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

भाजपकडूनही पक्षविरोधी कार्यवाही करणाऱ्यांवर कार्यवाही

गोंदिया विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या उमेदवारीला घेऊन भाजप-सेना- रिपाई (आ) या महायुतीविरुद्ध काम केल्याचा ठपका ठेवून जिल्हा महामंत्री भाउराव उके, मंडल अध्यक्ष (ग्रामीण) छत्रपाल तुरकर,  ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अमित बुद्धे, अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष रतन वासनिक, गोंदिया ग्रामीण महामंत्री मुनेश रहांगडाले, गोंदिया पं.स. सदस्य रामराज खरे यांना जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी पक्षातून निष्कासित केले आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणखी निष्कासित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...