गोंदिया,दि.04ः-भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार तसेच तिरोड्याचे माजी आमदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांनी आज शुक्रवारला(दि.04) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.
डाॅ.बोपचे यांचे चिरजिंव व भाजपचे जिल्हा महामंत्री रविकांत(गुड्डू)बोपचे यांनी तिरोडा विधानसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती.मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षत्याग करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तिरोडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस रिपाईचे अधिकृत उमेदवार म्हणून रविकांत बोपचे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्यांच्या प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर
No comments:
Post a Comment