Tuesday 15 October 2019

गोंदिया जिल्हावासींना आणखी ‘त्या’ दोन विडीओची प्रतिक्षा

 ‘ए लाव रे तो व्हिडीओ’चा धुमाकुळ अद्यापही सुरूच
नागपूरच्या एका मराठी वृत्तवाहिनीचा पत्रकार झाला मालामाल?
गोंदिया,दि. 15 : गोंदिया जिल्ह्यात आगामी 21 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा दुसरा टप्प्याला सुरवात झाली असताना जिल्ह्यात  ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत सलाम-ए इश्क या गाण्यावर तरूणाईसह अबालवृद्ध ठेका धरत प्रचार  करीत असल्याचे चित्र आहे. देवरी आमगाव परिसरात तर या विडीओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची एकही संधी सोडताना कोणीही उमेदवार दिसत नाही. आतातर आणखी ‘ते दोन विडीओ आले कारे’ म्हणत आणखी विडीओ पसरणार असल्याच्या चर्चेने जिल्ह्यावासीयांना त्या विडीओची किती प्रतिक्षा आहे, याचा अंदाज येतो. दरम्यान, नागपूर येथील एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने या प्रकरणी मोठा सौदा करून लाखोंची माया घशात घातल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
निवडणुकीत प्रचार आणि अपप्रचार या दोन्ही बाबींवर भर देण्यात येतो. आयुष्यात कधी कळत किंवा नकळत घडलेल्या एखाद्या गोष्टीचा किती भयानक प्रकार अनुभवावा येऊ शकतो, याची प्रचिती येत आहे.  आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्याची एकही संधी निवडणुकीत सोडली जात नाही. असाच प्रकार सध्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी मतदार संघात सुरू आहे. या भागातील एका उमेदवाराचा (हमशक्ल) सलाम-ए- इश्क मेरी जान या गाण्यावर डान्स बारमध्ये दारू पित नाचताना आणि त्या बारबालावर नोटा उधळतानाचा विडीओ  निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी व्हायरल झाला. हा व्हिडीओ थेट तासाभरात जिल्ह्यातील प्रत्येक मोबाईलमधील गॅलरीत पोचला. या विडीओने तर राज्यातही काही तासातच चांगलाच कहर केल्याची माहिती आहे. यावरून चांगलेच वादळ उठले. काहींनी गंमत आणि कुतुहलापोटी विडीओ आपल्या मित्रांना पाठविला.  या क्षेत्रात एका महत्वाच्या आणि जबाबदार सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा कृत्याची अपेक्षा नसल्याने अनेकांनी  त्या व्यक्ती विरुद्ध संताप व्यक्त केला. काहींनी तर असे लोकप्रतिनिधीच नको, हे समाजाला कोठे नेतील याचा नेम नाही असे मत सोशल मिडीयावरून व्यक्त केले. सांगीतले. 
हा विडीओ वायरल झाल्यापासून आणखी दोन विडीओ प्रसारित होणार असल्याची चर्चा जिल्ह्यात पसरविण्यात आली. त्यावर जिल्ह्यात पुन्हा ‘ते दोन विडीओ आले कारे’ म्हणत प्रतिक्षेत असलेल्या विडीओंची विचारणा केली जात आहे. दरम्यान, नागपूर येथील एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने संबंधितांना फासात अडकवत लाखोंची माया लाटल्याची चर्चा सुद्धा चांगलीच गरम आहे. येणारे दोन विडीओ आणखी कोणाला उजेडात आणतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...