पूर्व विदर्भातील समस्यांचा पाढा शासन दरबारी वाचणारे एकमेव निर्भिड न्यूज पोर्टल
Thursday, 10 October 2019
आयटीची धाडः खोदा पहाड निकला चुहा
सरकारच्या इशाऱ्यावरून सूडबुद्धीची कारवाई
वंचितचा आरोप
मुंबई,दि.10 -राज्यातील विधानसभा निवडणुकांअगोदरच वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद निर्माण झाला. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचे ठरविले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत स्वबळावर लढत आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्यात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आयकर विभागाने (आयटी) वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर धाड टाकली. मात्र, छापेमारीत अधिकाऱ्यांना केवळ ११०० रुपये आढळून आल्याने आयटीची धाड म्हणजे खोदा पहाड औऱ निकला चुहा अशा टीकेची धनी झाली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका कार्यालयावर आयटीने छापा टाकला. या छाप्यात आयटी अधिकाऱ्यांना ११०० रुपये आढळून आले. दरम्यान आयटीच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर वंचितच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली असा आरोप वंचित आघाडीकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून अशी कारवाई करत असल्याचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे खोदा पहाड निकला चूहा अशी आयटीची स्थिती झाली आहे. ",
No comments:
Post a Comment