Tuesday 8 October 2019

देवरीत आधारकार्डावरून पैसे चोरणाèयांची टोळी सक्रिय


प्रशासन अनभिज्ञ; ग्राहक जागृती कार्यक्रमाचा अभाव, पोलिसात तक्रार
सुरेश भदाडे/देवरी,दि.08- तुम्हाला पंचायत समितीकडून बोनस मिळणार आहे. त्यासाठी सव्र्हे करत असल्याची बतावणी करून गरीब,आदिवासी आणि अल्पशिक्षितांचे आधारकार्ड आणि बायोमॅट्रीक मशिनच्या साह्यायाने बँक खात्यातील रक्कम लंपास करणारी टोळी देवरी तालुक्यात सक्रिय झाली आहे. गेल्या ३ तारखेला तालुक्यातील नवाटोला येथे काही महिलांच्या तक्रारीवरून सदर प्रकार उजेडात आला असून प्रशासन मात्र या प्रकारापासून अद्यापही अनभिज्ञ आहे. सरकार वा आर्थिक संस्थाच्या माध्यमातून बायोमॅट्रीच्या साहाय्याने केले जाणारे विड्रॉलविषयी जागृती अभियानाभावी ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असल्याची शक्यता आहे. या डिजीटलाझेसनच्या माध्यमातून गरिबांना आर्थिक कंगालीच्या दरीत लोटणाचे प्रकार थांबविण्यासाठी शासन प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. दरम्यान, देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांनी याप्रकरणी तक्रार मिळाल्याचे सांगत चौकशी सुरू असल्याचे म्हटले.
देशात सर्वत्र डिजीटलायझेशनच्या नावाखाली सर्वच आर्थिक व्यवहार आता ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. आर्थिक व्यवहार करताना सुरक्षिततेसाठी अनेक उपाय केले असताना आता ग्रामीण भागात सुद्धा मोबाईल बँकिग, इंटरनेट आणि वॉलेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सदर व्यवहार करताना मोबाईल नंबर, बँक खाते आणि सुरक्षितता म्हणून ओटीपीच्या साहाय्याने देवाणघेवाण केली जाते. याशिवाय आधारकार्ड qलक असलेल्या बँक खात्यातून बायोमेट्रीक पद्धतीचा वापर करून पैसे ट्रान्स्फर करण्याची सोय उपलब्ध झाल्याने गावागावात अशी दुकानदारी थाटण्यात आली आहे. या पद्धतीला खुद्द बँकांनीच चालना दिल्याचे दिसून येत आहे. या पद्धतीमध्ये आपल्या हाताचे ठसे हेच सुरक्षा उपाय आहे. यामुळे आर्थिक गुन्हे करणाèया चोरट्यांना ग्रामीण भागात या पद्धतीचा वापर करून गरीब, आदिवासी जनतेला फसवून त्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारण्याची शक्कल लढविली आहे.
असाच प्रकार देवरी तालुक्यातील नवाटोला येथे गेल्या ३ तारखेला समोर आला. दोन पंचेवीसीतील तरुण दुचाकीवरून गावात आले. त्यांनी एका महिलेच्या घरी जाऊन आम्ही पंचायत समितीकडून आल्याचे सांगत आपल्याला बोनस, घरकूल, संडास वा इतर लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सव्र्हे करीत असल्याचे सांगितले.
आपला आधारकार्ड पंचायत समितीच्या रेकॉर्डमध्ये लिंक नसल्याने ते qलक करणे जरूरी आहे. हा सव्र्हे ऑनलाइन असून पंधरा दिवसानंतर आपल्याकडे पंचायत समितीमधून कर्मचारी येतील आणि आपल्याला पाच हजाराचा बोनस देतील, अशी बतावणी करून त्यांना आधारकार्डची मागणी केली. यानंतर बायोमॅट्रीक थंब मशिनवर त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यास सुरवात केली. याची माहिती गावात पसरताच आणखी महिला एकत्र येण्याला सुरवात झाली. मात्र, सदर युवकांनी आपले qबग फुटून आपण कोणाच्या हाती लागू नये, यासाठी qलक फेल झाल्याचे सांगत तिथून पोबारा केला. दरम्यान, या भामट्यांनी त्यापूर्वी आठ-दहा महिलांच्या खात्यातील रक्कम लंपास केली. पीडित महिलांमध्ये अंजू मडावी याच्या खात्यातून ४ हजार, रीता मनोहर राऊत ३ हजार, शारदा उईके १० हजार, ललिता नेताम ७ हजार (सर्व देना बँक) छाया गणवीर, विमला उईके, सुशीला उईके (पासबुकमध्ये नोंदी नसल्याने आकडा कळू शकला नाही) यांचेसह इतर महिलांच्या खात्यातून रक्कम लंपास करून भामटे पसार झाले.
दरम्यान, हा प्रकार लगतच्या गावातही सुरू असल्याची माहिती आहे. हा तालुका आदिवासी तालुका असून येथील जनता प्रशासनातील कर्मचाèयांवर पूर्ण विश्वास दाखविणारी असल्याने या भागातील गरीब जनतेला सर्रास लुटणे सुरू आहे.
या प्रकाराविषयी प्रशासकीय अधिकाèयांशी बोलले असता त्यांनी आपल्या कानावर हात ठेवत माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, अशा फसलेल्या लोकांना बँक प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तालुक्यात अशा पद्धतीने लूट सुरू असून हा आकडा कोट्यवधींच्या घरात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक महिला पतीच्या भीतीने तर अनेकांना ते लुटले गेल्याची अद्यापही माहिती नसल्याने ते कायम अंधारात असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. मजेशीर भाग म्हणजे ज्या पद्धतीने सरकारने डिजिटल वा ऑनलाइन व्यवहाराच्या प्रचारप्रसार केला, तसा ग्रामीण भागातील जनतेला साक्षर करण्याचा कोणताही प्रकार केला नसल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे भामट्यांनी सुद्धा लबाडीची ऑनलाइन पद्धत शोधून काढल्याने गरीब जनता सर्रास लुटली जात आहे. दरम्यान, ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव, मोबाईलचे सुरक्षित वापर आणि बायोमॅट्रीक पद्धतीने केले जाणारे व्यवहाराबद्दल माहितीचा अभाव हा ग्रामीण जनतेला लुबाडण्याचे एकमेव साधन बनल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...