देवरी,दि. 31ः येथील एमआयडीसीमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हस्ते उदघाटन झालेल्या ग्राझिया टुलीओ लाईफस्टाईल प्रायव्हे़ट लिमिटेड कंपनी (स्टील प्लांट)येथे प्राथमिक माहितीनुसार आज गुरुवारला काम सुरु असताना वितळलेल्या लोखंडाचा द्रव्य अंगावर पडल्याने दुपारी 1 वाजेच्या सुमारास कामावर असलेल्या 7 कामगार भाजल्याची घटना घडली.
जखमी कामगारात बिरबल, अजित सोनटक्के, पंचदेवराव, सुनिल कुमार राव,यादव,अरशद अंसारी हे सर्व 90 टक्क्याच्यावर भाजले गेले असून यापैकी तिघांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय व उर्वरित जखमींना गोंदिया वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले आहेत.यासंदर्भात तेथील सुरक्षारक्षक काहीही बोलायला तयार नसल्याने सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. देवरी पोलिसात प्रकरणाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, अद्यापही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, येथे कारखान्यामध्ये कच्च्या लोखंडावर प्रक्रिया करून लोखंडी साहित्य तयार करण्यात येते. या कामावर पुरुष कामगारांसह महिला कामगारही कामावर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर प्रत्यक्ष घटनास्थळावर असलेल्या महिला कामगारांनी या कंपनीमध्ये सुरक्षाविषयक साधने कामगारांना पुरविली जात नसल्याची तक्रार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे केली. उल्लेखनीय म्हणजे या कंपनीत अल्पमजुरीवर कामगारांकडून काम करवून घेत त्यांचे शोषण होत असल्याचे समोर येत आहे. याशिवाय या कामगारांचा कोणताही विमा या कंपनीने उतरविला नसल्याची कुजबूज परिसरात होती. सदर कंपनी लागू असलेल्या कायद्याची सर्रास पायमल्ली करीत असल्याने पोलिस प्रशासन या कंपनीविरोधात कोणती कार्यवाही करते, याकडे देवरीवासियांचे लक्ष लागून आहे.

No comments:
Post a Comment