Monday, 7 October 2019

देवरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ध्वजसंचलन


देवरी(सुरेश भदाडे)दि.06ःयेत्या विधानसभा निवडणुका तसेच नवरात्रोत्सव व दसरा उत्सवाच्या निमित्ताने देवरी उपपोलीस मुख्यालयाच्यावतीने आज शहरातील मुख्य मार्गाने पोलीस ध्वजसंचलन व पथसंचलन करण्यात आले.अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात ही पथसंचलन देवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य राष्ट्रीय महामार्ग व गावातील रस्ताने करण्यात आले. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व खुल्या वातावरणात पार पाडण्याच्या उ्ददेशाने सकाळी 11/30 वाजता देवरी पोलीस स्टेशन येथून पथसंचलनाला सुरवात करण्यात आली.यात पोलीस स्टेशनचे एक अधिकारी, 15 पोलीस कर्मचारी,दोन होमगार्ड तसेच बीएसएफ एक कंपनीसह चार अधिकारी व 60 कर्मचारी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...