Monday, 7 October 2019

खाद्यपदार्थात विषारीऔषध देऊन लुटणारा आरपीएफच्या जाळ्यात




गोंदिया - खाद्यपदार्थ विषारी पदार्थाची भेसळ करुन प्रवाशांना लुटणाऱ्या व्यक्तीला आरपीएफच्या पोलिसांनी पकडले असून त्याचे नाव प्रभुसिंग झगरसिंग (५२)रा.लहुरीया(बिहार)असे आहे.
गोंदिया स्थानकावरुन दररोज सुटणाऱ्या गोंदिया बरोनी या रेल्वेगाडीत गेल्या अनेक महिन्यापासून प्रवाशांना खाद्यपदार्थामध्ये विषारी औषध देऊन लुटपाट करीत असल्याच्या घटना सुुरु होत्या. यामुळे रेल्वेपोलिस फोर्सने याप्रकरणाला गांभीर्याने घेत खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवली होती. दरम्यान, रविवारच्या रात्री गोंदिया स्थानकावरुन बरोनीएक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला किसमीस देऊन विषारी औषध भेसळ करुन दिल्याने प्रवाशी बेहोश झाल्याचे उघडकीस आले. त्या प्रवाशाला रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तपासाअंती खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या बिहारच्या एका व्यक्तीला ताब्यात घेत तपास केला असता त्यांने कबुली दिल्याने त्याच्या विरुध्द रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...