तिरोडा,दि.09- तिरोडा -गोरेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती तिरोडा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर पारधी यांनी दिली आहे., उल्लेखनीय म्हणजे दिलीप बनसोड यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही स्वपक्षात बंडखोरी करून अधिकृत उमेदवाराला पराभूत करण्यात हातभार लावून भाजपला सहकार्य केले होते, हे विशेष.
सविस्तर असे की, तिरोडा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविकांत बोपचे यांची अंतिम क्षणी उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीप बनसोड हे कमालीचे अस्वस्थ झाले. नाराज बनसोड यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, बनसोड यांनी त्या नेत्यांना न जुमानता आपली उमेदवारी कायम ठेवून पक्षालाच आव्हान दिले. यामुळे राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पक्षातून निष्कासित केले असल्याची माहीती श्री. पारधी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment