Tuesday, 8 October 2019

पक्षाचे नुकसान करणा-यांचे रावणदहन करा-खा.प्रफुल पटेल


गोंदिया,दि.०८ – काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष हे दोघा भावंडासारखे आहेत. या भावडांमध्ये फूट टाकणारे आता बाहेर पडले. यामुळे आता आपल्यात भ्रमाची स्थिती उरली नाही. ज्यांनी आपल्या पक्षाचे नुकसान केले, अशांचे आता रावण दहन करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीने वजनदार नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया येथील प्रितम लॉन येथे गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँगेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महाआघाडीचे उमेदवार अमर वराडे यांच्या प्रचाराकरीता आयोजित सभेत केले.
यावेळी मंचावर काँग्रेसचे राज्य प्रचार प्रमुख व माजी खासदार नाना पटोले,काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,धन्नालाल नागरीकर,उमेदवार अमर वराडे,प्रदेश सचिव विनोद जैन,नामदेव किरसान,राजकुमार भेलावे,माजी नगराध्यक्ष के.बी.चव्हाण,अशोक(गप्पु)गुप्ता,शिव शर्मा,कुंदन कटारे,केतन तुरकर,हरिष तुळसकर,आलोक मोहंती,जितेंद्र कटरे,दिलीप डोये,जितेश टेंभरे,बाळकृष्ण पटले,जगदिश बहेकार,विजय बहेकार,अमर राहुल,अशोक शहारे,तिर्थराज हरिणखेडे,राजेश तुरकर,पृथ्वीपालqसह गुलाटी,दिलीप गौतम आदी मान्यवर या सभेला उपस्थित होते.
खासदार पटेल पुढे बोलताना म्हणाले की, जे जे पक्षात फूट पाडणारे स्वार्थी लोक ठाण मांडून बसले होते,ते सर्व आता सोडून गेले आहेत. त्यामुळे झालेली चूक आता दुरुस्त झाली आहे. आता दोन्हीकडे भ्रमाची स्थिती नाही. त्यामुळे आपण आता एकजुटीने लढले पाहिजे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघे भावंड असल्याने व्यक्तिगत शत्रुत्व ठेवण्याचे काही कारण उरले नाही. ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी दोन्ही पक्षाचे नुकसान केले, अशांचे तुम्ही आता रावणदहन करून टाका.या बाहेर गेलेल्यांनी दोन्ही पक्षात भ्रम पसरवून पक्षांचे खूप नुकसान केले. आता माझे काँग्रेसशी पुन्हा नाते जुळले आहे.

मी भंडारा गोंदियात काँग्रेसच्या नुकसान करण्यासाठी कधीही लढलो नाही. गयारामांच्या संस्कारांना तिलांजली द्यायची वेळ आली आहे. काँग्रेसने तिकीट वाटपात वेळ वाया घालवल्याने ही वेळ आली. काँग्रेसच्या वरिष्ठांनी लक्ष दिले नाही. अमर वèहाडेला निवडून आणायचा हेच माझे उद्देश आहे. सामान्य माणूसच लढत देऊ. शकतो. निवडणूक ही पैशापेक्षा बुध्दीचा वापर करून जिंकता येते. ग्रामपंचायतीसारखे नियोजन करून प्रचाराची धुरा हातात घ्या. निकाल तुमच्या मनासारखा येईल, असा आशावाद सुद्धा त्यांनी बोलून दाखविला.यावेळी माजी खासदार नाना पटोले यांनी अमर वराडे हा सर्वसामान्य कार्यकर्ता असून पक्षाशी एकनिष्ट व्यक्ती आहे.पक्षाने वराडेंना नव्हे तर काँग्रेसच्या प्रत्येक युवकाला ही उमेदवारी दिली असून नव्या जोमाने काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.आजपर्यंत आपल्या घरातून ज्यांनी काँग्रेसला चालवत काँग्रेस संपविण्याचे काम केले,त्यांनाच संपविण्याचे दिवस आले असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी आपला उमेदवार हा सक्षम असल्याचे मनात ठासून विजयाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.आपल्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती नसली तरी ती हितकारक बनविण्याची क्षमता आपल्यात असल्याचे पटोले म्हणाले.यावेळी छावा संग्रामचे निलम हलमारेसंह त्यांच्या शेकडो कार्यकत्र्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस रिपाईचे पदाधिकारी,कार्यकर्ते,जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,सरपंच,उपसपंचासह सर्वांना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...