मुंबई,दि.12ः भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे.
गोंदिया विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या उमेदवारीला घेऊन भाजप-सेना- रिपाई (आ) या महायुतीविरुद्ध रिंगणात उतरलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी विनोद अग्रवाल यांच्यासह सीमा सावळे पिंपरी चिंचवड,सतीश होले दक्षिण नागपूर,अशोक केदार मेळघाट,गुलाब मडावी गडचिरोली व राजू तोडसाम आर्णी, यवतमाळ यांना निलबिंत करण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment