Tuesday, 1 October 2019

हनी ट्रॅपः कोण कोणाची इज्जत वाचवायची? एशआयची समोर आव्हान


Honey Trap Scandal: SIT too in jumple; Which leader to save the honor? | हनी ट्रॅप स्कँडल : एसआयटीही बुचकळ्यात; कोणत्या कोणत्या नेत्याची इज्जत वाचवायची?

भोपाळ,दि.01 - गेल्या महिन्यात देशातील सर्वात मोठे आणि हायप्रोफाईल सेक्स स्कँडल उघड झाले. यामध्ये मध्यप्रदेशसह देशभरातील मोठमोठे राजकीय नेते, बडे अधिकारी, पत्रकार, व्यवसायिक, कंत्राटदार अडकलेले आहेत.

या टोळीकडून केवळ कंत्राटे, खंडणी उकळण्याचीच कामे करण्यात आलेली नसून लोकसभा निवडणुकीतही नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे व्हिडीओ कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर येत आहे. मात्र, अश्लील फोटो आणि व्हिडीओ जस जसे बाहेर येऊ लागले, तस तसे प्रत्येकासमोर आपली कशी इज्जत वाचवायची, हा पेच निर्माण झाली आहे. त्यामुळे चौकशी करत असलेल्या एसआयटीसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

२८ आमदार, १३ आयएएस, १२ व्यवसायिक, ४ मंत्री, ३ खासदार, ४ पत्रकार आणि एक माजी मुख्यमंत्री हे या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे उघडकीस आले आहे. मध्य प्रदेशातील या हनी ट्रॅप प्रकरणामुळे देशातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. यामध्ये भाजपसह अन्य पक्षांतील नेतेही सहभागी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आधी हे प्रकरण केवळ कंत्राटे मिळविण्यासाठी  सेक्स स्कँडल करण्यात आल्याचे पुढे आले होते. मात्र, नंतर या प्रकरणाची व्याप्ती एवढी वाढली की, जवळपास 4 हजार व्हिडीओ क्लीप आणि करोडो रुपयांची खंडणी एवढ्यावर पोहोचली. या हानी ट्रॅपमध्ये लिपस्टिक कव्हर, गॉगल, चष्मे यांद्वारे छुप्या कॅमेऱ्यातून व्हिडीओ बनवले जात होते. आरती दयाल हिने ही ब्लॅकमेलिंग गॅंग बनवली होती. व्हिडिओद्वारेच आरती दयालचे बिंग फुटले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...