गोंदिया,दि.०५ः-गोंदिया जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात ५८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून सर्वाधिक उमेदवारांची संख्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात २० तर सर्वात कमी आमगाव विधानसभा मतदारसंघात १० उमेदवार आहेत.तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने ते रिंगणात आहेत.येत्या ७ आक्टोंबरला किती उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात,त्याकडे लक्ष लागले आहे.
तिरोडा विधानसभा मतदारसंघा उमेदवारी अर्ज छाननीनंतर १४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले– कमल बाबुलाल हटवार(बसप),रविकांत खुशाल बोपचे(राष्ट्रवादी काँग्रेस),विजय भरतलाल रहागंडाले(भाजप),झामqसह अनिरुध्द रहागंडाले(जय महाभारत पार्टी),संदीप राजकुमार तिलगामे(वंचित बहुजन आघाडी),धनंजय दुधराम टेकाम,डॉ.नामदेव दसाराम किरसान,दिलीप मानिक नारनवरे,दिलीप वामन बनसोड,जगदिश चंद्रभान बावनथडे,रामविलास शोभेलाल मस्करे,राजेशकुमार तायवाडे,राजेंद्र बोंदरे,नरेंद्रकुमार रहागंडाले,विजय तिडके व विलास नागदेवे (अपक्ष)यांचा समावेश आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात २० उमेदवार- मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे(राष्ट्रवादी काँग्रेस),राजकुमार सुदाम बडोले(भारतीय जनता पार्टी),शिवदास श्रावण साखरे(बसप),अजय संभाजी लांजेवार(वंचित बहुजन आ्रघाडी),इंजि.दिलीपकुमार वालदे(बहुजन विकास आघाडी),अजय सुरेश बडोले,आनंदुकमार जांभुळकर,अंजली महेंद्र जाभुंळकर,कैलास डोंगरे,निशांत हिरालाल राऊत,विशाल कृष्णकुमार शेंडे,जगन गडपाल,नितीन उल्हास भालेराव, राजेश मुलचंद नंदागवळी,एड.पोमेश रामटेके,प्रमोद गजभिये,प्रितम साखरे,माणिक घनाडे,इंजि.रत्नदिप दहिवले,रिता अजय लांजेवार यांचा अपक्ष म्हणून समावेश आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार – गोपालदास अग्रवाल(भारतीय जनता पार्टी),धुर्वास भोयस(बसप),अमर प्रभाकर वराडे(काँग्रेस),जनार्दन मोहन बनकर(वंचित बहुनज आघाडी),चनिराम मेश्राम(भारतीय शेतकरी कामगार पक्ष),पुरुषोत्तम मोदी(आम आदमी पार्टी),अतुल हलमारे(बळीराजा पार्टी),रामेश्वर शेंडे,विनोद अग्रवाल,कमलेश उके,प्रमोद गजभिये,अरुणकुमार चव्हाण,विष्णु नागरीकर,जावेद पठाण यांचा अपक्ष म्हणून समावेश आहे.
आमगाव विधानसभा मतदारसंघ १० उमेदवार- अमर पंधरे(बसप),सहेसराम कोरेटे(काँगे्रस),संजय पुराम(भाजप),उमेशकुमार सरोटे(गोंडवाना गणतंत्र पार्टी),सुभाष रामरामे(वंचित बहुजन आघाडी),ईश्वरादास कोल्हारे,उर्मिला टेकाम,रामरतन राऊत,नामदेव किरसान,निकेश राऊत यांचा अपक्ष उमेदवार म्हणून समावेश आहे.
No comments:
Post a Comment