गोंदिया,दि.०१ः- गोंदिया विधानसभा मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहिलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी निवडणुक लढविण्याची घोषणा केली असून ते ३ आँक्टोबंरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विनोद अग्रवाल यांनी आपण जनतेचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे म्हटले आहे.त्यासाठी आज मंगळवारला येथील जलाराम लान येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला उपस्थित नेते व पदाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.३० ते ४० हजार भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु झाली असून भाजपमध्ये आलेल्या उमेदवाराला कुठल्याही परिस्थितीत सहकार्य न करण्याची भूमिका पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी घेतल्याचे वृत्त आहे.
No comments:
Post a Comment