Thursday, 3 October 2019

देवरी नगरपंचायतच्या विकास कामाची गती मंदावली

शासनाने मान्य केलेले अनेक विकाश कामे थंड बस्त्यात….
देवरी: ३:- शहरात शासनाने करोडो रुपयाचा निधि विकास कामाकरीता दिला या निधी मार्फत मुख्य मार्गावरील अनेक कार्य करण्यात आले. शहरात ज्या ठिकाणी जिथे त्या कामांची आवश्यक्ता होती त्या ठिकाणचे अनेक कामे नऊ-दहा महीन्यापासुन प्रलबिंत असल्याचे बघावयास मिळते.
सविस्तर असे की,प्रभाग क्र. १२ येथ अनेक रस्ते – नाली चे विकास कामे करन्यात आले, पन ज्या ठीकानी त्या सीमेंट कांक्रेट व नालीची आवश्यक्ता आहे त्याठीकानी अजुन दुर्लक्ष करन्यात आले आहे . विशेष म्हनजे प्रभाग क्रमांक १२ येथील वंदनाकन्या शाळा ते गभने सर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काम नगरपंतायतच्या अद्यक्षा ,उपाद्यक्ष ,व नगरशेवकांच्या अनेक वेळा परीसरातील लोकांनी नजरेत आनुन दील्या नंतरही त्यानीं दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्या परीसरातील लोक करीत आहेत.
……………………………………
याच वंदना कन्या शाळा ते गभने सर यांच्या घरापर्यंत च्या राहनार्या गल्लीत लोकांच्या घरातुन निघनार्या शौचालयातील संपुर्ण पाणी रोडावर (त्याच गल्लीत) येत असल्यामुळे त्या ठीकानी घानीच्या पाण्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरत आहे व सतत याचा परीनाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्यामुळे लोकांत नगरपंचायतच्या कारभारवर संताप व्यक्त केल्या जात आहे.यावर परीसरातील लोकांनी संबधीत अधिकार्यानां यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन कामाला सुरवात करावी असी मागनी करत येत्या महीन्याभरात या कार्यास सुरवात न केल्यास नगरपंचायत विषया जनआंदोलन करन्यात येईल अशा ईसारा दीला आहे .
…………………………………….
या संदर्भात संबधीत कंत्राटदाराशी बोलले अयता त्यानीं अजुन वेळ लागेल असे म्हनत हात झटकले आहे.याच अद्यक्ष ,उपाद्यक्ष व नगरशेवकांच्या हात झटकन्यामुळे शहरातील अनेक विकाश कामाची गती मंदावली असुन शहरात झालेल्या विकास कामाला त्या उर्वरीत कामामुळे खींड पडत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...