गोंदिया,दि.10ः-जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघातील कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, आर. पी.आय., पी री पा. महागठबंधनचे अधिकृत उम्मेदवार रविकांत खुशाल बोपचे यांच्या प्रचाराकरीता राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खासदार प्रफुल पटेल उद्या शुक्रवार(दि.11) यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
खा.पटेल हे महाआघाडीचे स्टारप्रचारक असून तिरोड्याची निवडणुक त्यांनी खांद्यावर घेतली आहे.गेल्या सर्व निवडणुकामधील चुकां सुधारण्याच्या चंग त्यांनी घेतला असून यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी तिरोड्यावर खास नजर पटेलांनी ठेवली आहे.त्याअंतर्गत खा.पटेल हे शुक्रवारला तिरोडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचाराकरीता सकाळी 11.30 वाजता धापेवाडा,दुपारी 12.30 वाजता सेजगाव येथे डाॅ.किशोर पारधी यांच्या निवासस्थानी सभा,दुपारी 2.30 वाजता एकोडी येथे रविंद्र सोनावने यांच्या घरासमोर सभा,सायकांळी 3.30 वाजता बेरडीपार येथील माता चौकात सभा,सायकांळी 4.30 वाजता तिरोडा येथे साई प्लाजा काॅम्पलेक्स येथे निवडणुक कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत. सायकांळी 6.30 वाजता ठाणेगाव येथील सदाशिव पटले यांच्या निवासस्थानी सभा आणि रात्री 7.30 वाजता वडेगाव बाजार चौक येथे आयोजित सभांना मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन,जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.योगेंद्र भगत,तालुका काँग्रस अध्यक्ष राधेलाल पटले,जिल्हामहिलाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,राँका तालुकाध्यक्ष प्रेम रहागंडाले,मनोज डोंगरे,डाॅ.किशोर पारधी,सभापती वीणा रहागंडाले,जि.प.सदस्या वीणा बिसेन यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.यावेळी काॅंग्रेस, राकाँं,आरपीआय,पिरीपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment