Saturday, 21 July 2018

मानसिक आजारग्रस्त मुलीला रेल्वे पोलिसांनी केले कुटुंबीयांच्या स्वाधीन




गोंदिया,दि.21ः-रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला घेवून रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.१ वर कार्यरत रेल्वे सुरक्षा बल अधिकारी कर्मचार्‍यांना संशयास्पद अवस्थेत मानसिक आजाराने ग्रस्त १९ वर्षीय मुलगी मिळून आली. तिची विचारपूस केली असता मुलीने आपली ओळख पटवून दिल्यानंतर तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. (दि.१९) सकाळी १0 वाजता सुमारास स्थानकावरील फलाट क्र.१ वर कार्यरत रेल्वे पोलिस उपनिरीक्षक एस.एस. बघेल, प्र.आ.यु.के. कुलदीप, प्र.आ.आर.सी. कटरे, आरक्षक एल.एस. बघेल, महिला कर्मचारी शबिया खातून यांना १९ वर्षीय मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली. तिची विचारपूस केली असता मुलीने दुर्ग (छ.ग) येथे राहत असल्याचे सांगितले. मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी मुलीची ओळख पटवून ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची सांगितले. माहितीची शहनिशा करून मुलीला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

अंकित अग्रवाल सीए परीक्षा उत्तीर्ण

गोंदिया : २१ जुलै (बेरार टाइम्स) "लहरोसे डर के नौका पार नही होती और कोशिश करणे वालोकी कभी हार नही होती।" इस पक्तिओ को पढ़के मन में एक प्रेरणा जागृत होती है ।  ऐसा ही कुछ गोंदिया के अंकित निर्मल अग्रवाल ने कर दिखाया।  हाल हि मे सी ए परीक्षा के परीणाम घोषित किये गये इस परीक्षा मे अंकित ने अच्छे अंक लेकर सफलता हाशिल की है। 
अंकित अग्रवाल गोंदिया के कल्पवृक्ष एजुकेशन सोसाइटी के सचिव निर्मल अग्रवाल इनके बेटे है वह इस संस्था में कोषाध्यक्ष का काम संभालते है। 
अंकित ने अपनी सफलताका श्रेय अपने माता पिता, गुरुजन और सभी परिवारजनो को दिया। इस मौके पर ब्लॉसम पब्लिक स्कूल के प्रिंसिपल सुजीत टेटे और स्कूल के सभी कर्चारियोने बधाईया दी।  

Friday, 20 July 2018

चंद्रपूरात 50 लाखांचा अनुदान घोटाळा

चंद्रपूर,दि.20 – जिल्ह्यातील 12 संस्थाविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सन 2008 ते 2015-16 या कालावधीत सदर 12 संस्थांना व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास व युवक कल्याण योजनेंतर्गत अनुदान दिले होते. मात्र, या अनुदानाद्वारे 50 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप क्रीडा अधिकाऱ्यांनी केला आहे.केंद्र सरकारच्या या अनुदानाचा विनियोग केला गेलाच नाही. या अनुदानाची रक्कम 14 टक्के व्याजासह शासनाला परत करण्याचे पत्रही देण्यात आले होते. मात्र, ही रक्कम परत दिली नाही. त्यामुळे ही शासनाची फसवणूक आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन देत हिवाळी अधिवेशन नागपूरचे हिरावले

नागपूर, दि. 20 : राष्ट्रगीताने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन 19 नाव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.दरवर्षी नागपूरात होणारे हिवाळी अधिवेशन यावेळी भाजप सरकारने नागपूरपासून हिरावत यादरम्यान होणारे मोर्चे धरणे व विदर्भाच्या मु्द्याकडे दुर्लक्ष केले.जेव्हा की नागपूरात यावेळी मुंबईत पावसाची स्थिती बघून घेण्यात आलेले पावसाळी अधिवेशन सुध्दा विदर्भासाठी पाहिजे तसे लाभदायक राहिलेले नाही.पुढच्या लोकसभा निवडणुका बघून हे अधिवेशन मुंबईत घेण्याची तयारी सरकारने केली आहे.

देवरी बीएसएनएल दूरसंचार विभागाचा भोंगळ कारभार

देवरी:१९ जुलै ( तालुका प्रतिनिधी ) सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे प्रत्येक व्यक्ती मोबाइल सेवे पासून एकमेकासोबत जोडलेला आहे परंतु देवरी येथील दूरसंचार विभागाच्या अक्रियाशील कामामुळे ८० टक्के लँडलाईन फोन बंद अवस्थेत पडलेले आहेत. वारंवार तक्रार करून देखील सुद्धा शाळा, महाविद्यालय , कार्यालय, यांच्या समस्या आता पर्यंत सोडविल्या गेल्या नसल्यामुळे सर्व स्तरावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
डिजिटल इंडिया चा स्वप्न दाखविणाऱ्या लोकांना सुद्धा या गोष्टी कडे लक्ष द्यायला पाहिजे आणि खाजगी कंपन्या पेक्षा भारत संचार निगम  लिमिटेड ला सुधार करून ग्राहकाच्या समस्या वर लक्ष केंद्रित करून सहकार्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे १-२ महिने फोने असून देखील सुद्धा पूर्ण बिलाचा भुदंड ग्राहकावर बसत आहे. लोकांच्या माहिती नुसार सिम कार्ड बदलविण्याची २००/- चार्ज सर्रास वसूल केल्याचे वृत्त देवरी दूरसंचार विभागात सुरु आहे .  

मोदींनी दत्तक घेतलेल्या 4 गावात 1 रुपयाही निधी खर्च नाही


RTI does not cost Rs. 1 in 4 villages that Modi has adopted | RTI कॉपी व्हायरल, मोदींनी दत्तक घेतलेल्या 4 गावात 1 रुपयाही निधी खर्च नाही
नवी दिल्ली,दि.20 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांसद आदर्शग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या वाराणसी मंतदारसंघातील चारपैकी एकाही गावात विकासाकामासाठी 1 रुपयांचा सुद्धा खर्च करण्यात आला नाही. जिल्हा ग्रामविकास प्राधिकरणाकडून माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. प्राधिकरणाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी 'विकास वेडा झाल्याचे' हेच खरे सत्य असल्याचे म्हटले आहे.

कन्नौज येथील रहिवासी अनुज वर्मा यांनी माहिती अधिकाराचा वापर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांबाबत माहिती मागवली होती. वर्मा यांच्या या विनंती अर्जाला जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाने 30 जून रोजी पत्र पाठवून माहिती दिली. मोदींनी वाराणसीतील जयापूर, नागेपूर, ककरहिया आणि डोमरी ही चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारही गावांमध्ये गेल्या 4 वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. विशेष म्हणजे या गावात झालेला विकास हा सरकारी योजना आणि कंपनींच्या सीएसआरमधून करण्यात आला आहे. तर काही संस्थांनीही मदत करुन गावच्या विकासात हातभार लावला आहे. 

ब्लॉसम चे जीत आणि संस्कृती नवोदय परिक्षेत चमकले

मुख्याध्यापक सुजित टेटे विद्यार्थ्यांचा अभिनंदन करतांना 
देवरी: १९जुलै
आदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या देवरी तालुक़यातिल लोकप्रिय आणि नानाविविध सहशालेय उपक्रमातून निरनिराळे संदेश देणारी ब्लॉसम पब्लिक स्कूल ही एकमेव शाळा.
आजचे युग हे स्पर्धेचे युग म्हनून ओळखले जाते याचि सुरुवात शालेय जीवनापासुन व्हावी आणि विध्यार्थ्याना स्पर्धा परिक्षेचे महत्व कळावे या उद्देशाने मुख्याध्यापक सुजित टेटे विध्यार्थ्याना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. नवोदय परीक्षे सोबत विविध परीक्षेचे आयोजन शाळेत केले जाते त्यामुळे शाळेत स्पर्धेचे वातावरं बघावयास मिळते. 
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा इयत्ता ६ चे जीत ओमप्रकाश धवले आणि संस्कृती सुभाष लांजेवार या विध्यार्थ्यानी नवोदय परिक्षेत बाज़ी मारली असून शाळेची परंपरा क़ायम ठेवत शाळेचे तसेच पालकांचे नाव चमकवले.
शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे, संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, वर्गशिक्षक विस्वप्रित निकोड़े आणि समस्त शिक्षक आणि विध्यार्थ्यानी दोघाचे अभिनंदन केले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...