नवी दिल्ली,दि.20 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांसद आदर्शग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या वाराणसी मंतदारसंघातील चारपैकी एकाही गावात विकासाकामासाठी 1 रुपयांचा सुद्धा खर्च करण्यात आला नाही. जिल्हा ग्रामविकास प्राधिकरणाकडून माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. प्राधिकरणाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी 'विकास वेडा झाल्याचे' हेच खरे सत्य असल्याचे म्हटले आहे.
कन्नौज येथील रहिवासी अनुज वर्मा यांनी माहिती अधिकाराचा वापर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांबाबत माहिती मागवली होती. वर्मा यांच्या या विनंती अर्जाला जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाने 30 जून रोजी पत्र पाठवून माहिती दिली. मोदींनी वाराणसीतील जयापूर, नागेपूर, ककरहिया आणि डोमरी ही चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारही गावांमध्ये गेल्या 4 वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. विशेष म्हणजे या गावात झालेला विकास हा सरकारी योजना आणि कंपनींच्या सीएसआरमधून करण्यात आला आहे. तर काही संस्थांनीही मदत करुन गावच्या विकासात हातभार लावला आहे.
No comments:
Post a Comment