Saturday, 7 July 2018

मेंडकी उपक्षेत्रात वाघिणीचा मृतदेह

ब्रह्मपुरी,दि.0७-ब्रम्हपुरी वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मेंडकी उप क्षेत्रातील कक्ष क्रमांक १५२ मध्ये ५ जुलै रोजी पोलीस पाटील, चिचखेडा यांनी उत्तर ब्रम्हपुरी वन परिक्षेत्र मध्ये एक वाघिण मृत असल्याची वन विभागाला दिली. तसेच ब्रम्हपुरी सह.वन संरक्षक एनटीसीएचे प्रतिनिधी डॉ.दिशा शर्मा, वन्यजीव प्रतिनिधी विवेक करंबेळकर , मानद वन्यजीव रक्षक व कर्मचारी यांनी सदर घटनास्थळी जाऊन वाघिण मृत असल्याचे घोषित केले. सदर वाघिण ही १ ते २ दिवसाआधी मृत पावली असावी असा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...