नांदेड,दि.18ः-मराठी पत्रकार परिषद व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ देशमुख, सरचिटणीस अभय कुळकजाईकर, कार्याध्यक्षपदी रविंद्र संगनवार यांची निवड मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, राम शेवडीकर, प्रकाश कांबळे यांनी एका बैठकीत जाहिर केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची महानगर व जिल्ह्यातील पत्रकारांची बैठक संपन्न झाली.बैठकिच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर होते. बैठकिस जेष्ठ संपादक शंतनू डोईफोडे, परिषद कार्यकारिणी सदस्य राम शेवडीकर, प्रकाश कांबळे, विभागीय सचिव विजय जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी सरचिटणीस सुभाष लोणे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी घोषित करण्यात आलेली कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष विश्वनाथ देशमुख, उपाध्यक्ष अविनाश पाटील, किरण कुलकर्णी, सरचिटणीस अभय कुळकजाईकर, कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार, कोषाध्यक्ष नरेश तुप्तेवार, जिल्हा प्रतिनिधी सूर्यकुमार यन्नावार, सहसचिव संभाजी सोनकांबळे, प्रसिध्दी प्रमुख अमृत देशमुख सदस्य ज्ञानेश्वर सुनेगावकर यांची निवड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विजय जोशी, राम शेवडीकर, प्रकाश कांबळे यांनी जहिर केली.नवनियुक्त अध्यक्ष, पदाधिकार्यांचे स्वागत जेष्ठ पत्रकार अधिस्विकृती समिती सदस्य शंतनू डोईफोडे व उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी सभेस उज्वलाताई भवरे,समन्वयक कृष्णा उमरीकर, कोषाध्यक्ष राजेश शिंदे, उपाध्यक्ष यासिन बेग इनामदार, सहसचिव आजम बेग, अनिल धमने, राजेंद्र कांबळे, सुनिल पारडे, प्रविण खंदारे, सचिन डोंगळीकर, जयराम वन्ने, एस.एम.मुदखेडकर, सदाशिव गच्चे, अंकुश सोनसळे, संघरत्न पवार, सुरेश काशिदे, दिपंकर बावसकर,प्रमोद गजभारे, त्रिरत्न भवरे, हर्ष कुंडलवाडीकर, इम्रान खान पठाण गजानन कानडे आदीची उपस्थिती होते. बैठकिचे सुत्रसंचलन सरचिटणीस सुभाष लोणे यांनी केले तर शेवटी महानगर सरचिटणीस अभय कुळकजाईकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment