Sunday, 8 July 2018

डवकीच्या सिद्धार्थ विद्यालयात वृक्षारोपण

देवरी,दि.8- तालुक्यातील डवकीच्या सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालयात गेल्या  गुरूवारी (दि.5) मानव विकास योजने अंतर्गत वृक्षारोपण व सायकल वाटप करण्यात आले.
सिद्धार्थ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य महेंद्र मेश्राम हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून देवरी पं.स.च्या सभापती सुनंदा बहेकार, गटशिक्षणाधिकारी साकुरे , मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पटले , डवकीचे सरपंच उमराव  बावणकर  आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलेय दरम्यान, मानव विकास योजनेतून विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोगावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक सुद्धा देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निखारे सर,कुलसुंगे सर टेंभरे सर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
संचालन जागेश्वर ठवरे सर यांनी केले. उपस्थितांचे आभार पटले सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...