Thursday 19 July 2018

दोन किमी अंतरावर सापडला टँकर,चालक अद्यापही बेपत्ता

गोंदिया,,दि.19ः- तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत पावसाने हजेरी लावल्याने पांगोली नदीसह छोट्या मोठय़ा नाल्यांनाही पूर आलेला असून रावणवाडी-कामठा-पांजरा मार्गावर असलेल्या पांगोली नदीवरील पुलावर सुध्दा या पुरामुळे पाणी चढले होते. या पाण्यातून जाणारा दुधाचा टँकर पलटल्याची घटना मंगळवार १७ जुलै रोजी रात्री ९ वाजता घडली. प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर घटना स्थळापासून दोन किलोमिटर अंतरावर टॅंकर सापडले असून चालकाची शोध मोहिम सुरू आहे. घटनास्थळी राज्य आपत्ती व्यवस्थापनाची चमु दाखल झाली आहे.
गोंदिया-कामठा मार्गाने दुधाने भरलेला टँकर कामठा मार्ग आमगावकडे जात होता. पुलावरून पाणी वाहत असताना देखील टँकर चालकाने टँकर (एमएच१६ सीसी 0३९२) काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे चालकाला नियंत्रण ठेवला आले नाही व टँकर हा नदीपात्रात कोसळला. या घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस व आपत्ती निवारण चमू घटनास्थळी दाखल होऊन टँकरचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, बुधवारी १८ जुलै रोजी टँकर घटनास्थळापासून दोन किमी अंतरावरील सोनारी घाटात आढळला असून चालकाचा शोध अद्याप लागला नसून उशीरापयर्ंत शोध कार्य सुरू होते. अहमदनगर येथील नवाब गुलाम पटेल यांच्या मालकीचा टँकर असून गौतम संतोष पाटील मानिकवाडा,ता.नरखेड जि.नागपूर असे टँकर चालकाचे नाव आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...