Friday 6 July 2018

वैद्यकीय प्रवेशात ओबीसी आरक्षणाप्रकरणी पालकमंत्र्यांचे बेजबाबदार वक्तव्य

ओबीसी संघर्ष कृती समितीचा आरोप
गोंदिया,दि.०6 :  सरकारची कृती ओबीसींच्या हिताचीच, वैद्यकीय प्रवेशात ओबीसी आरक्षणात कपात नाही. असे पालकमंत्री म्हणतात. जर का पालकमंत्री ना. राजकुमार बडोले अधिकृतपणे असे बोलले तर मुळात शुद्धपणे पालकमंत्री खोटे बोलतात अथवा ते सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांना अभ्यास नाही. फक्त प्रचार सभेत जसे जुमले फेकले जातात. त्या पद्धतीची विधान त्यांनी केलेला आहे. आंबेडकरवादी व्यक्ती समुवाद्यांच्या संस्कारात ऐवढा फितूर होत असतो ते यावरून लक्षात येते. असे ओबीसी संघर्ष कृती समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
 देशांतर्गत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एकूण जागांच्या ८५ टक्के जागा संबंधित राज्य भरतात आणि केंद्रीय वैद्यकीय प्रवेश निवड समिती १५ टक्के जागा केंद्राद्वारे भरल्या जात असतात. या १५ टक्के जागा यावर्षी १९,३२५ असून यामध्ये अनु.जाती १५ टक्के म्हणजे २,८९८ जागा, अनु. जमाती ७.५ टक्के म्हणजे १,४५० जागा आणि ओबीसींना फक्त ७४ जागा दिलेल्या असून उर्वरीत १४,९०३ जागा म्हणजे ७६ टक्के जागा खुल्या प्रवर्गाकडे वळविल्या आहेत. ओबीसींना वास्तविक २७ टक्के केंद्रातील आरक्षणानुसार ज्यामध्ये महाराष्टÑातील एस.बी.सी. व सर्व एन.टी. यांचा समावेश होतो. यांना एकत्रित ५,२१८ जागा मिळायला पाहिजे. परंतु ओबीसींचा वाटा केंद्रीय निवड समितीने ओपनकडे वळविले. पालकमंत्री महोदय आपण मत सर्वसामान्यांचे घेता आणि कृती व वक्तव्य आणि हवालदारी मनुवाद्यांची करता. खरच निष्ठावंत आंबेडकरी चळवळीतून निर्माण झालेला व्यक्ती मंत्रीपदासाठी ऐवढ्या निम्न दर्जा स्विकारेल हे अपेक्षित नाही. राजकारणाचा भाग नाही, आपण आमच्या समितीच्या कार्यकर्त्यांपुढे राजकारणी भाषा बोलली, अहो काँग्रेसने ऐवढे वर्ष ओबीसींना मुर्ख बनविले म्हणूनच तर ओबीसींनी भाजपा व आपल्याला सर्वाधिक मदत केली हे विसरू नका, खोटे व दिशाभूल करणारे विधान परत घ्या, अथवा आव्हान स्विकारा, असे ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांना ओबीसी संघर्ष कृती समितीचे आव्हान 
-वैद्यकीय प्रवेशात ओबीसी आरक्षणात कपात नाही. पालकमंत्र्यानी केंद्राच्या १५ टक्के कोट्यात ओबीसींना २७ टक्के जागा मिळाल्या त्या विद्यार्थ्यांची यादी जारी करावी, अन्यथा खोट्या विधानासंदर्भात माफी मागावी.
– काँग्रेसने ओबीसींना ६० वर्षे मुर्ख बनविले हे सत्य आहे, म्हणूनच तर तुमच्यावर विश्वास घातला, आपण ओबीसींना महामुर्ख बनविणार का?
– ओबीसी अज्ञानामुळे संवैधानिक हक्कापासून आतापर्यंत वंचित राहिला. आता मात्र मनुवाद्यांचे डाव ओबीसीला समजतात. अन्याय सहन करणार नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...