Friday, 6 July 2018

बीजीडब्लू रुग्णालय जलमय,वार्डात शिरले पाणी

गोंदिया,दि.06ः-गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय म्हटलं की वेगवेगळ्या कारणांने चर्चेतील नाव.कधी बाळचोरीकरीता,तर कधी प्रसुतीकरीता डाॅक्टराकंडून पैसे घेण्याकरीता. रुग्णांच्या नातेवाईंना मारहाण करण्याकरीता अशा अनेक गोष्टींनी परिचित असलेले बाई गंगाबाई रुग्णालय गुरुवारला मात्र आलेल्या मुसळधार पावसामुळे चर्चेत आले.तब्बल दोन तास आलेल्या जोरदार पावसाने रुग्णालय प्रशासनासह नगरप्रशासनाचीही पोलखोल करुन टाकली.या जोरदारपावसामुळे बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वर्हाड्यांसह प्रसुतीमहिला व विविध आजाराच्या उपचारासाठी आलेल्या महिला ज्या वार्डात होत्या.त्या वार्डात शिरलेल्या पावसाच्या पाण्याने हे रुग्णालय पुर्णतःजलमय झाले होते.रात्री 9 वाजेपासून गोंदियातील काही सामाजिक क्षेत्रात काम करणार्या युवकांना माहिती होताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.आणि रुग्णालयातील जलमय परिसराचे छायाचित्र व्हायरल केले.त्यानंतरही जिल्ह्यातील कुठलाही मोठा प्रशासनीक अधिकारी रात्रीपर्यंत त्याठिकाणी पोचू शकलेला नव्हता.
एकीकडे 2 हजार 300 रुग्णामागे एक खाट असल्याचे वास्तव्य सरकारनेच कबुल केले आहे.त्यातच गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयातील हे आरोग्यव्यवस्थेचे विदारक सत्य दाखविणारे वास्तवचित्र सरकारच्या कुबलीला खरे ठरवणारे ठरले.प्रसुती महिलांची व बाळाची अतिकाळजी अपेक्षित असताना त्या वार्डात पावसाच्या पाण्यासह घाण पाणी शिरल्याने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळला गेला.त्यातही यावर्षीच हा प्रकार घडला असे नव्हे तर गेल्यावर्षीसुद्दा अशीच स्थिती निर्माण झाली होती.त्यानंतरही प्रशासनाने त्याची सुध घेतली नाही ही खरी शोकातिंका म्हणावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...