Thursday, 26 July 2018

महिलांना संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची ओळख असणे गरजेचे

गोंदिया,दि.26 : दैनंदिन जीवन तसेच कारभारात महिलांसोबत विविध घटना घडतात. मात्र महिलांना कायद्याची जाणीव नसल्याने त्या काहीच करू शकत नाही. याकरिता, महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची ओळख असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांनी केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महिला राज्यसत्ता आंदोलन यांच्या संयुक्तवतीने पंचायत समिती सभागृहात आयोजीत महिला सरपंच व सदस्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
उद्घाटन जिल्हा परिषद बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, खंडविकास अधिकारी डॉ. पानझाडे, विभागीय समन्वयक रत्नमाला वैद्य उपस्थित होत्या.
कार्यशाळेत रामटेके यांनी, राज्य महिला आयोगाची भूमिका मांडताना कार्यशाळेचा उद्देश व महिला कारभारणी यांना गावविकास करत असतांना जातात विविध घटना घडतात. तेव्हा कायद्याचा वापर कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. पानझाडे यांनी, राज्य महिला आयोग महिला अत्याचारावर छान काम करत असल्याचे सांगीतले. तर जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी व पंचात समिती सभापती हरिणखेडे यांनीही महिलांना मागदर्शन केले.
प्रास्ताविक रत्नामाला वैद्य यांनी मांडले. संचालन सावित्री अ‍ॅकेडमीचे महेंद्र मेश्राम यांनी केले. आभार शर्मिला चिमनकर व साधु तिरपुडे यांनी मानले. कार्यशाळेत मोठ्या संख्येत महिला सरपंच व सदस्य उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...