गोंदिङ्मा,दि.२५: श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सभारंभ बुधवार १५ ऑगस्ट रोजी राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.एच.एच.पारधी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी, खासदार मधुकर कुकडे,माजी खासदार नाना पटोले,खासदार अशोक नेते, आमदार परिणय फुके,आमदार विजय रहांगडाले,आमदार संजय पुराम, माजी आ‘दार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, शिव शर्मा, जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,अशोक अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणा-या विविध पुरस्कारासाठी जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, स्तंभलेखक, छायाचित्रकार, वृतवाहिनी पत्रकाराकडुन पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका ९ ऑगस्ट पर्यंत जमा करावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक सावन डोये यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात संघाच्या कार्यकारीची बैठक नुकतीच शासकिय विश्रामगृहात पार पडली. या सभेतच टिळक गौरव पुरस्कारासाठी दैनिक लोकमत समाचार चे सहाय्यक संपादक विकास बोरकर यांची २०१८ च्या टिळक गौरव पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली.पुरस्कारासाठी १ मे २०१७ ते १ जुन २०१८ या दरम्यान प्रकाशित बातम्या, लेख, व संपादकीय ग्राह्य धरले जातील प्रवेशिका दोन प्रतीत मुळ कात्रण व स्पर्धेकांच्या अद्यावत छायाचित्रासह सादर करणे आवश्यक राहील. मुदतीनंतर आलेल्या प्रवेशिकावर विचार करण्यात येणार नाही.जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment