Friday 20 July 2018

आश्रमशाळेत विद्यार्थिनीचे शोषण!

यवतमाळ,दि.20 : यवतमाळ जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचे तेथील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी बुधवारी दि. 18) पत्रकार परिषदेत केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी असे काहीही घडले नसल्याचा निर्वाळा दिल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आश्रमशाळेतील एका महिला अधीक्षिकेने यासंदर्भातील तक्रार मार्च महिन्यातच मुख्याध्यापकाकडे केली होती. पण, त्यांनी काहीही चौकशी केली नाही. प्रकल्प कार्यालयाच्या पथकाने आश्रमशाळेत येऊन चौकशी केली. मात्र, त्यांनी सदर कर्मचाऱ्याला “क्‍लीन चिट’ दिली. याबाबत चार मे रोजी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून तांत्रिक मुद्दा उपस्थित करून चौकशी टाळण्यात आली. अपर आयुक्तांनीाही तक्रारीची दखल घेतली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय व राज्य महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग, तथा राज्यपालांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
या प्रकरणाची “सीबीआय’मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, हेमंतकुमार कांबळे, नागेश कुमरे, जगदीश मडावी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...