Thursday, 19 July 2018

लाच घेतांना केटीएसचा सहा.अधिक्षक कोहाट जाळ्यात




गोंदिया,दि.19ः-येथील कुवंरतिलक सिंह जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सहाय्यक अधिक्षक मनोहर कोहाट यांना 10 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारला कार्यालयीन वेळेत रंगेहाथ पकडले.तक्रारदाराची नागपूर येथे सोलरपाॅवर कंपनी असून त्यांची पत्नी केटीएस रुग्णालयात अधिपरिचारिका पदावर कार्यरत आहे.पत्नीचे वैद्यकिय रजेेचे चार महिन्याचे बिल काढण्याकरीता आरोपीने तक्रारदाराकडे 15 हजार रुपयाची मागणी केली.परंतु तक्रारदारास ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे पोलीस उपअधिक्षक रमांकात कोकाटे यांच्या नेतृत्वात गोंदिया चमूने सापळा रचला.आरोपीने पंचासमक्ष 10 हजाराची लाच स्विकारल्यानंतर ताब्यात घेऊन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...