Wednesday, 4 July 2018

राष्‍ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभियेंचे संभाजी भिडेच्या वेशभूषेत


नागपूर,दि.04- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून (बुधवार) प्रारंभ होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या विदर्भवाद्यांनी नागपूर बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी अनोखे आंदोलन करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आमदार गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधान भवन परिसरात दाखल झाले. त्यांच्या हातात आंब्याची टोपली होती. टोपलीतील प्रत्येक अांब्यावर संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे असा उल्लेख करण्‍यात आला आहे. आमदार गजभिये यांनी भिडेंच्या अटकेची केली मागणी केली आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम तसेच काँग्रेस प्रवक्त रणदीप सुरजेवला यांच्यावर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. सिडकोच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री आणि लाड यांच्यावर आरोप केल्याबद्दल अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...