Thursday, 19 July 2018

उपविभागीय कार्यालयासाठी क्रीडा संकुलाची तोडफोड




अर्जुनी मोरगाव,दि.19ः- केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेवर भर टाकून स्वच्छ भारत मिशन राबवित आहे, स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यत पोहोचविण्याचे कामही शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होत आहे. परंतु, ‘दिव्या खाली अंधार’ या म्हणीचा परिचय अजुर्नी मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय स्वच्छतेला घेवून देत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय क्रीडा संकूलात थाटले असले तरी कार्यालय परिसराला घाणीचा विळखा आहे. याशिवाय उपविभागीय कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे विविध कामासाठी येणारे विद्यार्थी व नागरिक त्रस्त होत आहेत. यामुळे आजघडीला अजुर्नी मोरगाव तालुक्यासह सडक अजुर्नी तालुक्यातील नागरिकांमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय चांगलेच चर्चेत आहे.
विशेष म्हणजे हे तालुका मुख्यालय सामाजिक न्याय मंत्री यांच्या मतदारसंघातील आहे.
अर्जुनी मोरगाव हा जिल्ह्याच्या टोकावरचा तालुका आहे. येथील नागरिकांना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कामकाजासाठी गोंदिया शहरापर्यत धाव घ्यावी लागत होती. याकरीता राज्य शासनाने अजुर्नी मोरगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापित केले. तुर्तास कार्यालयासाठी क्रीडा संकूल निवडण्यात आले. आजघडीला उपविभागीय अधिकारी कार्यालय नव्या इमारतीचे बांधकाम होईपर्यत क्रीडा संकूल येथे आहे. परंतु, या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा अनागोंदी कारभार अर्जुनी मोरगाव व सडक अजुर्नी तालुक्यातील नागरिकांना चांगलाच त्रस्त करीत आहे. त्याचबरोबर स्वच्छतेचा संदेश देणारा हा प्रमुख कार्यालय घाणीच्या विळख्यात सापडल्याने दुसर्‍याला ब्रम्हज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय परिचय देत आहे. कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली आहे. स्वच्छता नावाला दिसून येत नाही. मात्र, स्वच्छता राखण्यासंदर्भात भिंतीवर संदेश दिसून येतात. त्याचप्रमाणे कर्मचारी व अधिकारी आपल्या मनर्मजीपणाने कर्तव्य बजावत असल्याने विविध कामासाठी येणार्‍या विद्यार्थी व नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय नागरिकांमध्ये चर्चेत आला आहे. याकडे जनप्रतिनिधीने लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
क्रीडा संकूलाची नियमाबाह्य तोडफोड
स्वतंत्र कार्यालय इमारत बांधकाम पूर्ण होईपयर्ंत क्रीडा संकूल येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय थाटण्यात आले आहे. क्रीडा संकूल खेळाडूंसाठी तयार करण्यात आले आहे. परंतु, या संकूलात असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाने प्रशासनाकडून नियमबाह्य तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यवधीच्या निधीतून तयार करण्यात आलेले हे क्रीडा संकूल खेळाडूंसाठी खेळापुरते राहणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारामुळे खेळाडूं व क्रीडाप्रेमींमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...