Friday 20 July 2018

देवरी बीएसएनएल दूरसंचार विभागाचा भोंगळ कारभार

देवरी:१९ जुलै ( तालुका प्रतिनिधी ) सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे प्रत्येक व्यक्ती मोबाइल सेवे पासून एकमेकासोबत जोडलेला आहे परंतु देवरी येथील दूरसंचार विभागाच्या अक्रियाशील कामामुळे ८० टक्के लँडलाईन फोन बंद अवस्थेत पडलेले आहेत. वारंवार तक्रार करून देखील सुद्धा शाळा, महाविद्यालय , कार्यालय, यांच्या समस्या आता पर्यंत सोडविल्या गेल्या नसल्यामुळे सर्व स्तरावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
डिजिटल इंडिया चा स्वप्न दाखविणाऱ्या लोकांना सुद्धा या गोष्टी कडे लक्ष द्यायला पाहिजे आणि खाजगी कंपन्या पेक्षा भारत संचार निगम  लिमिटेड ला सुधार करून ग्राहकाच्या समस्या वर लक्ष केंद्रित करून सहकार्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे १-२ महिने फोने असून देखील सुद्धा पूर्ण बिलाचा भुदंड ग्राहकावर बसत आहे. लोकांच्या माहिती नुसार सिम कार्ड बदलविण्याची २००/- चार्ज सर्रास वसूल केल्याचे वृत्त देवरी दूरसंचार विभागात सुरु आहे .  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...