Saturday, 7 July 2018

बॅनर होर्डिंग्स च्या वाढत्या प्रमाणामुळे ट्रकची विध्युत पोलाला धडक वाहतूक विस्कळीत

देवरी ०७जुलै येथील चिचगड रोड वर स्थित भाटिया पेट्रोल पम्प समोर आज सकाळी ट्रक ने विद्युत खांबाला धडक दिल्या मुळे ३ पोल तुटल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि ट्रक क्र MH35K 7196 सकाळी भाटिया पेट्रोल पंप कडे येत होता त्या वेळी हा अपघात घडला सुदयेवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु या रस्त्याने हजारो विध्यार्थी शाळेत जातात त्यामुळे पोलीस प्रशासन आणि नगर पंचायत ने वेळोवेळी लक्ष देणे आवश्यक आहे असी नागरिकांनी मागणी केली आहे. विशेष म्हणजे देवरी येथे बॅनर आणि होर्डिंग्स च्या वाढत्या प्रमाणामुळे रस्ता स्पष्ट दिसत नाही, कोणतीही व्यक्ती सर्रासपणे महामार्गाचे वर आणि शहरामध्ये सुध्दा विद्युत खांबावर बॅनर्स लावतात त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे असे प्रत्येक्षदर्शी चे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...