नागपूर,दि.20ः-राज्यातील बिगर आदिवासींवर होणारा अन्याय राज्य शासनाने त्वरित दूर करावा या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे, भरत गोगावले, रमेश लटके, प्रकाश भोईर, उज्ज्वल पाटील यांनी आज केली. या मागणीसाठी गुरुवारी त्यांनी विधान भवन परिसरात आंदोलन केले.विशेष म्हणजे विदर्भातील एकही आमदार या आंदोलनात सहभागी झालेला नव्हता हे विशेष.
२0१४ मध्ये राज्यपालांनी काढलेल्या अनुसूचित क्षेत्रातील १00 टक्के आदिवासी आरक्षणाच्या तुघलकी अध्यादेशाला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आतापर्यंत कोणताच तोडगा काढण्यात आला नाही. अनुसूचित क्षेत्रात २0 टक्के जागा नियमित आदिवासींसाठी आरक्षित करून ८0 टक्के जागा नियमित आरक्षणानुसार भरण्याचे आदेश काढले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ५0 टक्केपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रात पेसा कायदा लागू न करण्याचा ठराव संमत केला परंतु बिगर आदिवासींवरील अन्याय दूर झाला नाही असे ते पुढे म्हणाले.
No comments:
Post a Comment